Sunday, November 22, 2015

आठवणी अज्ञातांच्या

​आयुष्यात किती लोकांना भेटतो आपण? जन्माला आल्यापासून सुरू झालेली भेटीगाठींची शृंखला अगदी मरणापर्यंत चालू असते. यातले काही लोक अगदी चटकन आयुष्याचा एक भागच होऊन जातात तर काही तितक्याच सहजपणे विस्मरणात जातात. प्रत्येकाच्या स्वभावाची, विचारांची आणि सहवासाची वेगळी छाप आपल्या मनावर पडून जाते. अशा सुहृदांच्या सहवासात गेलेले अनेक क्षण नंतरच्या आयुष्यात आठवणींच्या रुपाने आपल्याला आनंदी करत असतात, पण इतक्या सहजतेने जगू देईल ते मन कसले!!! ज्ञात-अज्ञाताच्या सीमारेषेला सहज पार करून मन एखाद्या सुप्त आठवणीने अशी हुरहुर लावते की काही केल्या मन शांत होत नाही. 

Saturday, August 9, 2014

चौकट आणि तपास

तब्बल आठ डोळे त्या चौकटीमधून बाहेर बघत होते. आता ते एकाच माणसाचे नव्हते हे मी वेगळं सांगायला नकोय, पण तरीही या आठ डोळ्यांची वाटणी स्पष्ट करतो, म्हणजे या कथेच्या नको त्या भागामध्ये तुम्ही डोके खर्च करणार नाही.
तर या आठ डोळ्यांना दोन दोन च्या क्रमाने लावायचे झाले, तरी ते सोप्पे जाणार नाही.म्हणजे, दोन दोन चे गट तुम्ही पाडाल हो पण कोणता गट कुठल्या हुद्द्याने कुठल्या क्रमांकाला ठेवायचा हा वादाचा मुद्दा होणारच.... शेवटी आपल्या देशात हुद्दा आणि क्रमांक याशिवाय कोणाचे पान तरी हलते का!!!!!

Sunday, June 22, 2014

भूक

​गारपिटीचा मारा असह्यच होता. उभं पीक जेमतेम १० मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्णपणे आडवं झालं होतं. गुडघ्यात डोके घालून धर्मा शेताकडे तासन्तास बघत राही. कर्जाच्या डोंगराखालि दबून गेलेला धर्मा आताशी कुठे वर यायची स्वप्ने बघू लागला होता. आणि या आक्रिताने त्या स्वप्नांची धूळधाण उडवली होती.

Wednesday, June 27, 2012

बळी................

नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.......

Thursday, May 3, 2012

एक होता रोमेल


=========================================================================================

आपल्यासमोर एक अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान शत्रू आहे आणि युद्ध बाजूला ठेवून मी म्हणेन की तो एक अत्यंत शूर सेनापतीही आहे.
-विन्स्टन चर्चिल (ब्रिटिश पार्लमेंटसमोर)

=========================================================================================

१९४४ चा ऑक्टोबर थंडीचा विलक्षण कडाका दाखवत होता. संपूर्ण युरोप बर्फाच्या साम्राज्याखाली आला होता. नजर जाईल तिथपर्यंत केवळ पांढरे आच्छादन दिसत होते.  पण या साम्राज्याची कोणालाही तमा नव्हती. गेली आठ वर्षे युरोपच नव्हे तर संपूर्ण जग एकाच माणसाच्या राक्षसीपणात पोळून निघाले होते. त्याच्या साम्राज्याचा अंत केव्हा होणार हा एकच प्रश्न सध्या महत्वाचा होता. कोणतेही युद्ध आपल्याबरोबर संहार आणि सूडभावना घेऊन येते. पहिल्या महायुद्धानंतर सूडभावनेने पेटून उठलेल्या जर्मनीने गेले सहा -आठ वर्षे संहाराचे रूप धारण केले होते.

Monday, January 16, 2012

भक्ती



उधळीत गुलाल, बडवीत मृदुंग,
सोहळा भक्तीचा, सुंदर सजतो ||
नाव घेती कोणी, कोणी धुंद होता
कल्लोळ  भक्तीचा, दूर पसरतो ||

Sunday, April 17, 2011

मी आणि बीपी



"मला हाय बीपी dignose झाले आहे."


आणि मंडळीमध्ये गोंधळ माजला.

लेखनसीमा

लेखनशक्ती ही मानवाला उगाच दिलेल्या अनेक निरुपयोगी शक्तींपैकी एक आहे असे माझे मत आहे. आता मी म्हणजे कोणी जगन्मान्य कर्तृत्ववान व्यक्ती नसल्याने माझ्या मताला देखील काही किंमत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण माझ्या एका (स्वघोषित) सहस्त्रबुद्धे आजोबांच्या शिकवणीनुसार " (लोकांचे कितीही डोके उठले तरीही) माझे मतप्रदर्शन मी करणारच "  या उक्तीवर माझा गाढ विश्वास असल्याने मी बोलणारच. आणि शिवाय लेखनाचे फायदे किती यावर लेखनप्रेमी मंडळी कायमच बोलत असतात. तर लेखनाचे तोटे किती यावर आमच्यासारखी लेखनद्वेष्टी मंडळी कधी बोलणार ?